Tuesday, January 31, 2023
नवीन वर्ष
31स्ट ला केला जातो,
बराच मोठा बेत
विषय काही साधे,
काहींची गगनास भेट
दर वर्षीच वाटतं
या वेळी करणार काही नवं,
आता मी क्लिअर आहे
आयुष्यात मला काय हवं
१ तारीख संपता संपता
मन ठिकाणावर येतं राव
कोणत्याच गोष्टीचा कुठे
दिसेनासा होतो ठाव
तरी पण एक सांगतो
नेहमीच वाट शोधा नवी
उत्तम काम करण्यासाठी
विशिष्ट तारीख का हवी
सूर्यास्त
संध्याकाळी मरीन ड्राइव्ह ला पाहिला सूर्यास्त,
सोबत होती तिची, वेळ गेला मस्त
एकाच गोष्टीविषयी बोलण्यात ती होती व्यस्त,
सुरवातीला याने मी, होऊन गेलो त्रस्त
ती मात्र बोलत होती फार उत्साहाने,
डोळ्यात मी पाहत राहिलो, तिच्या कुतूहलाने
काही वेळाने पाण्याखाली, गेला सूर्य हळूच,
वाराही होता मंद, काय ती झुळूक
बोलायचे होते बरेच, राहून गेले मात्र
परत वाटले ठीक आहे, होईलच दुसरे सत्र
सूर्यास्त समुद्र अन् ती, याहून काय असेल छान
झालो मी मंत्रमुग्ध हरवून बसलो भान
Subscribe to:
Posts (Atom)