Friday, November 17, 2023

श्वास

आहे सण दिवाळीचा, पण वाटत नाहीये फार मजा दिसतोय सर्वत्र उत्साह, पण मूड नाही होत ताजा करून पाहिली सर्व गोळा बेरीज, पण आहे काही तरी वजा मी आहे इथे, पण श्वास लोणीला माझा

Tuesday, January 31, 2023

नवीन वर्ष

31स्ट ला केला जातो, बराच मोठा बेत विषय काही साधे, काहींची गगनास भेट दर वर्षीच वाटतं या वेळी करणार काही नवं, आता मी क्लिअर आहे आयुष्यात मला काय हवं १ तारीख संपता संपता मन ठिकाणावर येतं राव कोणत्याच गोष्टीचा कुठे दिसेनासा होतो ठाव तरी पण एक सांगतो नेहमीच वाट शोधा नवी उत्तम काम करण्यासाठी विशिष्ट तारीख का हवी

सूर्यास्त

संध्याकाळी मरीन ड्राइव्ह ला पाहिला सूर्यास्त, सोबत होती तिची, वेळ गेला मस्त एकाच गोष्टीविषयी बोलण्यात ती होती व्यस्त, सुरवातीला याने मी, होऊन गेलो त्रस्त ती मात्र बोलत होती फार उत्साहाने, डोळ्यात मी पाहत राहिलो, तिच्या कुतूहलाने काही वेळाने पाण्याखाली, गेला सूर्य हळूच, वाराही होता मंद, काय ती झुळूक बोलायचे होते बरेच, राहून गेले मात्र परत वाटले ठीक आहे, होईलच दुसरे सत्र सूर्यास्त समुद्र अन् ती, याहून काय असेल छान झालो मी मंत्रमुग्ध हरवून बसलो भान

Friday, October 7, 2011

I Love You...

I don't know what love is
But I do like you
I may not ever say this
But I really do

When I look at you
I forget everything
N when you do the same
I feel like king

just a smile of yours
makes my heart sing
N its meant for me
I have started believing

I prefer your company
over any other thing
Don't think drink any
will have such zing

I can't describe this
its just amazing
Never had, never will have
such great feeling

I don't know how to say this
But I do love you
And I want you to know this
I really really do...

Friday, September 30, 2011

मी

कितीतरी वेळा विचार येत राही मनी
कसा आहे मी, खरंच कसा आहे मी

शुभ्र निरभ्र आकाशी कधी रंग शोधणारा मी
की जीवनाचे ढंग पाहूनी स्तिमित झालोय मी

गर्दी पाहुन बेफ़ाम, बावरून जाणारा मी
की गर्दीचाच एक भाग बनून गेलोय मी

सभोवतालच्या गोष्टींवर भाष्य करणारा मी
की स्वत:चे शब्द हरवलेला, सामान्य जीव मी

भ्रष्टाचार पाहूनी कधी, पेटून उठणारा मी
की टेबलाखालून हळूच पैसे सरकवणारा मी

एक मात्र नक्की, जाणीव आहे मनी
मी या देशाचा, ही माझी धरणी

हिच्यासाठी नक्कीच काही करून जाईन मी
ठरवलंय मी, हो ठरवलंय मी

कोणी काही म्हणो तमा केलीय कोणी
असा आहे मी, असाच आहे मी

जनरेशन गॅप..

बाबांना आम्ही ’डॅड’ म्हणतो, बोलतो वारेमाप
वाटेल तुम्हाला नाही यांना कोणाचाही चाप

’चॉकलेट डे’, ’सारी डे’ मागे किती आहे व्याप
तुम्हास मात्र कौतुक नाही, वाटे नसता ताप

इंटरनेटचे जग निराळे, खेळ असती अमाप
तुम्ही म्हणाल लागते यांना पळताक्षणी धाप

’ब्लॅकबेरी’ने विश्वाचे या सुंदर खेडे केले
काही कळेना याला पाहुन, नाक काहो मुरडले

परिधान जरी असे निराळा, मुळे आमुची घट्ट
नकोय आणखी काही आम्हाला, विश्वास हवा फ़क्त

वर्षानुवर्षे चालत आला हा ’जनरेशन गॅप’
आज आत्ता ताबडतोब, देऊ त्याला निरोप

विचारांमध्ये असेल भेद, नकोत मात्र भिंती
तीच असेल मग निर्वादपणे नव्या युगाची नांदी

Monday, September 15, 2008

वॅलेंटाईन डे

फ़ेब्रुवारी उजाडताच सुरू होतो शोध
सर्वांनाच लागलेले असते वॅलेंटाईनचे वेध

या दिवसाविषयी मग
गप्पा रंगतात भरपूर
सेलिब्रेशनच्या तयारीला मग
येतो महापूर

सेनावाले म्हनतात कसे
ही रीत नव्हे आपली
तरुण पिढीने या
संस्कृती नाही जपली

युवा पिढी म्हणते मग
करता वाढदिवसास सरबराई
हाच दिवस साजरा करण्यास
का असे मनाई

प्रश्न अनेक असले तरी
उत्तर मात्र नाही
कितीही केली तरी
चर्चा संपत नाही

मी तर म्हणतो चर्चा सोडा
एवरीथिंग इज फ़ाइन
तुम्हीही म्हणा कोणास तरी
यू आर माय वॅलेंटाईन!!!