कितीतरी वेळा विचार येत राही मनी
कसा आहे मी, खरंच कसा आहे मी
शुभ्र निरभ्र आकाशी कधी रंग शोधणारा मी
की जीवनाचे ढंग पाहूनी स्तिमित झालोय मी
गर्दी पाहुन बेफ़ाम, बावरून जाणारा मी
की गर्दीचाच एक भाग बनून गेलोय मी
सभोवतालच्या गोष्टींवर भाष्य करणारा मी
की स्वत:चे शब्द हरवलेला, सामान्य जीव मी
भ्रष्टाचार पाहूनी कधी, पेटून उठणारा मी
की टेबलाखालून हळूच पैसे सरकवणारा मी
एक मात्र नक्की, जाणीव आहे मनी
मी या देशाचा, ही माझी धरणी
हिच्यासाठी नक्कीच काही करून जाईन मी
ठरवलंय मी, हो ठरवलंय मी
कोणी काही म्हणो तमा केलीय कोणी
असा आहे मी, असाच आहे मी
Friday, September 30, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment