Friday, September 30, 2011

मी

कितीतरी वेळा विचार येत राही मनी
कसा आहे मी, खरंच कसा आहे मी

शुभ्र निरभ्र आकाशी कधी रंग शोधणारा मी
की जीवनाचे ढंग पाहूनी स्तिमित झालोय मी

गर्दी पाहुन बेफ़ाम, बावरून जाणारा मी
की गर्दीचाच एक भाग बनून गेलोय मी

सभोवतालच्या गोष्टींवर भाष्य करणारा मी
की स्वत:चे शब्द हरवलेला, सामान्य जीव मी

भ्रष्टाचार पाहूनी कधी, पेटून उठणारा मी
की टेबलाखालून हळूच पैसे सरकवणारा मी

एक मात्र नक्की, जाणीव आहे मनी
मी या देशाचा, ही माझी धरणी

हिच्यासाठी नक्कीच काही करून जाईन मी
ठरवलंय मी, हो ठरवलंय मी

कोणी काही म्हणो तमा केलीय कोणी
असा आहे मी, असाच आहे मी

जनरेशन गॅप..

बाबांना आम्ही ’डॅड’ म्हणतो, बोलतो वारेमाप
वाटेल तुम्हाला नाही यांना कोणाचाही चाप

’चॉकलेट डे’, ’सारी डे’ मागे किती आहे व्याप
तुम्हास मात्र कौतुक नाही, वाटे नसता ताप

इंटरनेटचे जग निराळे, खेळ असती अमाप
तुम्ही म्हणाल लागते यांना पळताक्षणी धाप

’ब्लॅकबेरी’ने विश्वाचे या सुंदर खेडे केले
काही कळेना याला पाहुन, नाक काहो मुरडले

परिधान जरी असे निराळा, मुळे आमुची घट्ट
नकोय आणखी काही आम्हाला, विश्वास हवा फ़क्त

वर्षानुवर्षे चालत आला हा ’जनरेशन गॅप’
आज आत्ता ताबडतोब, देऊ त्याला निरोप

विचारांमध्ये असेल भेद, नकोत मात्र भिंती
तीच असेल मग निर्वादपणे नव्या युगाची नांदी