फ़ेब्रुवारी उजाडताच सुरू होतो शोध
सर्वांनाच लागलेले असते वॅलेंटाईनचे वेध
या दिवसाविषयी मग
गप्पा रंगतात भरपूर
सेलिब्रेशनच्या तयारीला मग
येतो महापूर
सेनावाले म्हनतात कसे
ही रीत नव्हे आपली
तरुण पिढीने या
संस्कृती नाही जपली
युवा पिढी म्हणते मग
करता वाढदिवसास सरबराई
हाच दिवस साजरा करण्यास
का असे मनाई
प्रश्न अनेक असले तरी
उत्तर मात्र नाही
कितीही केली तरी
चर्चा संपत नाही
मी तर म्हणतो चर्चा सोडा
एवरीथिंग इज फ़ाइन
तुम्हीही म्हणा कोणास तरी
यू आर माय वॅलेंटाईन!!!
Monday, September 15, 2008
कविता
जेव्हा कधी मी एकांतात बसतो
न जाणे कुठून विचार मनी येतो
काहीतरी लिहावे असे मनातून वाटते
जेव्हा मग हा विचार द्रुढ होतो
न जाणे कुठून एक कल्पना सुचते
ती शब्दात उतरवावी असे मनातून वाटते
मग जेव्हा मी लिहायला बसतो
न जाणे कुठून सुंदर ओळ स्फुरते
ती कवितेत असावी असे मनातून वाटते
अशाच ओळींमागून ओळी लिहीत राहतो
न जाणे कुठून कविता जन्म घेते
ती सर्वांना आवडावी असे मनातून वाटते
न जाणे कुठून विचार मनी येतो
काहीतरी लिहावे असे मनातून वाटते
जेव्हा मग हा विचार द्रुढ होतो
न जाणे कुठून एक कल्पना सुचते
ती शब्दात उतरवावी असे मनातून वाटते
मग जेव्हा मी लिहायला बसतो
न जाणे कुठून सुंदर ओळ स्फुरते
ती कवितेत असावी असे मनातून वाटते
अशाच ओळींमागून ओळी लिहीत राहतो
न जाणे कुठून कविता जन्म घेते
ती सर्वांना आवडावी असे मनातून वाटते
आठवण
जेव्हा कधी मला
येते तुझी आठवण
मन हे वेड माझं
फ़िरु लागत वणवण
आठवतात मग मला
तुझ्यासोबतचे क्षण
भानावर येताच कळतं
ते आता नाहीत पण
आठवतो मग मला
तुझा तो सहवास
तू बाजुला असण्याचा
होत राह्तो आभास
उगाच विचार करुन मग
होतं मन उदास
कसं सांगु आठवतेस तू
घेतानाही श्वास
अंतर हे राहनार नाही
याची आहे जाणीव
तीच तर आहे सध्या
या जगण्याची नीव
आता मात्र येण्यास
तू नको करूस उशीर
तुला एकवार पाहण्यास
हे डोळे झालेत अधीर
फोटो तुझा पाहुनी मग
चेहरा खुलतो खास
जीवन हे सुंदर आहे
यावर बसतो विश्वास
येते तुझी आठवण
मन हे वेड माझं
फ़िरु लागत वणवण
आठवतात मग मला
तुझ्यासोबतचे क्षण
भानावर येताच कळतं
ते आता नाहीत पण
आठवतो मग मला
तुझा तो सहवास
तू बाजुला असण्याचा
होत राह्तो आभास
उगाच विचार करुन मग
होतं मन उदास
कसं सांगु आठवतेस तू
घेतानाही श्वास
अंतर हे राहनार नाही
याची आहे जाणीव
तीच तर आहे सध्या
या जगण्याची नीव
आता मात्र येण्यास
तू नको करूस उशीर
तुला एकवार पाहण्यास
हे डोळे झालेत अधीर
फोटो तुझा पाहुनी मग
चेहरा खुलतो खास
जीवन हे सुंदर आहे
यावर बसतो विश्वास
अशीही एक मैत्रीण असावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी दिसायला सुंदर असावी
जिला पाहताक्षणी कधीही
मनाची कळी खुलावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी दिलखुलास हसावी
आणि जिच्या नजरेमध्ये
कसलीही अपेक्षा नसावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी मनसोक्त बोलत बसावी
स्वभावाने साधी असली तरीही
भोळी ती नसावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी खोटेनाटे रुसावी
विनवताना मात्र जिला
चांगलीच कसरत लागावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी मनातले जाणत असावी
एवढे सर्व असेल अशी
मात्र ती कुठे गवसावी
अशीही एक मैत्रीण असावी
जिला पाहण्यास नजर तरसावी
पाहून जिला कोणासही वाटावे
आपलीही अशी मैत्रीण असावी
जी दिसायला सुंदर असावी
जिला पाहताक्षणी कधीही
मनाची कळी खुलावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी दिलखुलास हसावी
आणि जिच्या नजरेमध्ये
कसलीही अपेक्षा नसावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी मनसोक्त बोलत बसावी
स्वभावाने साधी असली तरीही
भोळी ती नसावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी खोटेनाटे रुसावी
विनवताना मात्र जिला
चांगलीच कसरत लागावी
अशीही एक मैत्रीण असावी
जी मनातले जाणत असावी
एवढे सर्व असेल अशी
मात्र ती कुठे गवसावी
अशीही एक मैत्रीण असावी
जिला पाहण्यास नजर तरसावी
पाहून जिला कोणासही वाटावे
आपलीही अशी मैत्रीण असावी
Subscribe to:
Posts (Atom)