Monday, September 15, 2008

अशीही एक मैत्रीण असावी

अशीही एक मैत्रीण असावी
जी दिसायला सुंदर असावी
जिला पाहताक्षणी कधीही
मनाची कळी खुलावी

अशीही एक मैत्रीण असावी
जी दिलखुलास हसावी
आणि जिच्या नजरेमध्ये
कसलीही अपेक्षा नसावी

अशीही एक मैत्रीण असावी
जी मनसोक्त बोलत बसावी
स्वभावाने साधी असली तरीही
भोळी ती नसावी

अशीही एक मैत्रीण असावी
जी खोटेनाटे रुसावी
विनवताना मात्र जिला
चांगलीच कसरत लागावी

अशीही एक मैत्रीण असावी
जी मनातले जाणत असावी
एवढे सर्व असेल अशी
मात्र ती कुठे गवसावी

अशीही एक मैत्रीण असावी
जिला पाहण्यास नजर तरसावी
पाहून जिला कोणासही वाटावे
आपलीही अशी मैत्रीण असावी

No comments: